टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:37 IST2025-06-04T14:36:22+5:302025-06-04T14:37:06+5:30

घरातील टॉयलेटचा दरवाजा उघडताच एका तरुणाला मोठा धक्का बसला. समोरच दृश्य पाहून त्याने अक्षरशः तिथून पळ काढला.

The young man ran away in fear as soon as the toilet door opened, but when his family checked, they were shocked! | टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का!

टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का!

उत्तर प्रदेशच्या शामलीमधील बाबरी परिसरात एका घरातील शौचालयात सापाची तब्बल ३५ पिल्ले आढळल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. या सापाच्या पिल्लांना पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही त्या घरात गर्दी केली होती. शौचालयात पाणी ओतून सापाच्या पिल्लांना बाहेर काढण्यात आले. भीतीमुळे आता कुटुंबाने घरातील शौचालयाला टाळा ठोकला आहे. 

बाबरी शहरातील संजय तायल यांचा मुलगा निशांत सोमवारी रात्री शौचालयात जात होता. मात्र, शौचालयाचा दरवाजा उघडताच समोर सापाचे पिल्लू पाहून त्याची बोबडी वळली. त्याने दरवाजा बंद करून तिथून पळ काढला. निशांतने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला देखील सांगितली. निशांतला घाबरलेले पाहून कुटुंबातील लोकांनी शौचालयाचा दरवाजा उघडला. मात्र, त्यांना काहीच दिसले नाही. 

यानंतर त्यांनी शौचालयात पाणी ओतले असता, त्यातून सापाची पिल्ले बाहेर येऊ लागली. ते पाहून सगळेच घाबरून गेले. या प्रकारची वाच्यता होताच आजूबाजूचे लोक देखील त्यांच्या घरी गर्दी करू लागले. सापाची किती पिल्ले आहेत, हे तपासण्यासाठी त्यांनी पाणी ओतायला सुरुवात केली. तर, पाण्याच्या दाबामुळे नाल्यातून तब्बल ३४ पिल्ले बाहेर आली. यातील काही पिल्ले जिवंत होती, तर काही पिल्ले आधीच मृत झाली होती. गावकऱ्यांनी त्या सगळ्यांना मातीत पुरलं. 

कुटुंब घाबरलं!     

या आधी गावात कधीच साप दिसला नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या घरात साप कुठून आले, याची कुणालाच काही कल्पना नाही. एकाच वेळी इतके साप दिसल्याने आता कुटुंबाला देखील धडकी भरली आहे. त्यांनी घरातील शौचालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.   

Web Title: The young man ran away in fear as soon as the toilet door opened, but when his family checked, they were shocked!