मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:14 IST2024-12-05T11:13:08+5:302024-12-05T11:14:01+5:30

Delhi Crime News: दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

The whole family was killed by the child, the triple murder in Delhi was such a riot   | मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  

मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  

दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हे तिहेरी हत्याकांड समोर आल्यानंतर बचावलेल्या मुलाने सांगितले होते की, मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. त्यादरम्यान, कुणीतरी घरात घुसून कुटुंबीयांची हत्या केली. मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा घरात कुणीच घुसलं नसल्याचं समोर आलं. त्याशिवाय घराच्या मेन गेटला लागलेलं कुलूप कुणी तोडलं नसल्याचं तसेच त्या कुलुपासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली नव्हती, अशी माहिती तपासामधून समोर आली. त्यानंतर पोलिसांना या हत्याकांडात बचावलेला मुलगा अर्जुन याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. 

आरोपी अर्जुन याने पोलिस चौकशीमध्ये सांगितले की, माझे वडील अभ्यासावरून रागवायचे. मात्र माझं अभ्यासावर मन लागत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला घराबाहेर अनेक लोकांसमोर ओरडून मारहाण केली होती. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. एवढंच नाही तर घरातही मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. घरामध्ये माझी आई आणि बहिण मला सपोर्ट करत नव्हती. याचदरम्यान, माझे वडील सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार असल्याचं मला कळलं. त्यामुळे नाराज होऊन मी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आरोपी अर्जुन याने बुधवारी सकाळी घरात ठेवलेला चाकू उचलला आणि तिघांचीही गळा कापून हत्या केली. या हत्याकांडामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं असलेलं कुटुंब आता त्यांच्यामध्ये नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नाही आहे. 

बुधवारी दिल्लीतील नेबसरायमधील देबली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांची ओळख राजेश कुमार, कोमल आणि मुलगी कविता अशी पटली होती.   

Web Title: The whole family was killed by the child, the triple murder in Delhi was such a riot  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.