सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:44 IST2025-11-04T16:43:59+5:302025-11-04T16:44:50+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे सप्तपदी घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान, दागिने न घातल्याने सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आणि वधू पक्षाच्या लोकांना वर अंकित वर्मा याला बेदम मारहाण करून त्याचे कपडे फाडून टाकले आणि त्याला ओलीस ठेवले.

सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे सप्तपदी घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान, दागिने न घातल्याने सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आणि वधू पक्षाच्या लोकांना वर अंकित वर्मा याला बेदम मारहाण करून त्याचे कपडे फाडून टाकले आणि त्याला ओलीस ठेवले. अखेरीस वराच्या भाओजींनी वधू पक्षाला दोन लाख रुपये दिले आणि हे प्रकरण मिटवले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली.
हे लग्न विवाह ठरवणाऱ्या एका वेबसाईटवरून ठरवण्यात आलं होतं. नवरा मुलगा असलेला अंकित वर्मा हा मुळचा कानपूरमधील रहिवासी असून, तो सध्या मथुरा येथील सुनारान येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये राहतो. तर वधूचे नातेवाईक आणि इतर मंडळीही मागच्या चार दिवसांपासून मथुरा येथे थांबलेली होती.
दरम्यान, लग्नावेळी सप्तपदी झाल्यानंतर जेव्हा वधूला दागिने घालण्याची वेळ आली तेव्हा वादाला तोंड फुटले आणि प्रकरण हाणामीरीपर्यंत पोहोचले. वर अंकित वर्मा याने स्वत:चं घर आणि चांगली नोकरी असल्याचं खोटं सांगून लग्न ठरवल्याचा आरोप वधू पक्षाने केला. त्यानंतर हा वाद एवढा वाढत गेला की आक्रमक झालेल्या वधू पक्षाने थेट वराला मारहाण करत त्याचे कपडे फाटले. विवाह स्थळ असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये रात्रभर हा गोंधळ सुरू होता.
त्यानंतर या वराच्या भाओजींनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी वधू पक्षाला दोन लाख रुपये देऊन तडजोड केली. अखेरीस हा वाद मिटला. मात्र लग्नगाठ बांधून सप्तपदी घेतल्यानंतर अवघ्यादोन तासांतच हे लग्न मोडलं आणि वधू पक्षाचे लोक तिथून निघून गेले.