शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

तीन मुद्द्यांवर ठरणार ईडब्ल्यूएसची वैधता; सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 7:34 AM

केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने १९७३ साली राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेबाबत विवेचन केले होते.

नवी दिल्ली : आर्थिक दुर्बल गटांसाठी  (ईडब्ल्यूएस) शिक्षणसंस्थांतील प्रवेश व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले आहेत. त्या मुद्द्यांवर व्यापक विचार करून न्यायालय या प्रकरणी निकाल देईल.केशवानंद भारती खटल्याचा निकाल महत्त्वाचाकेशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने १९७३ साली राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेबाबत विवेचन केले होते. राज्यघटनेच्या प्रत्येक भागामध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही. कायद्याचे राज्य, अधिकारांचे पृथक्करण, न्यायालयीन स्वातंत्र्य यांसारख्या बाबी राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात दुरुस्त्या करता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

व्यापक विचार करून न्यायालय निर्णय देणार -पहिला मुद्दा - आरक्षणासहित काही गोष्टींची विशेष तरतूद करण्याची सरकारला मुभा देऊन राज्यघटना कायद्याने (१०३वी घटनादुरुस्ती) राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लावला आहे का या पहिल्या मुद्द्याची तपासणी न्यायालय करणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, आर्थिक दुर्बल गटांसाठीच्या आरक्षणासंदर्भातील याचिकांसंदर्भात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार व्हावा, असे ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुचविले होते. त्या मुद्द्यांवर विचार करून या आरक्षणाचा निर्णय घटनाबाह्य आहे किंवा नाही याचा निर्णय न्यायालय करणार आहे. 

दुसरा मुद्दा  -विनाअनुदानित शिक्षणसंस्थांतील प्रवेशांबाबत विशेष तरतूद करण्याची मुभा सरकारला मिळाली आहे. यासंदर्भातील घटनादुरुस्ती ही राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेशी विसंगत आहे का या दुसऱ्या मुद्द्याचीही चिकित्सा सर्वोच्च न्यायालय करणार आहे. 

तिसरा मुद्दा -  आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाच्या कक्षेतून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (एसईबीसी), अन्य मागासवर्गीय (ओबीसी) अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी) यांना वगळण्याचा निर्णय १०३व्या घटनादुरुस्तीच्या आधारे घेतल्याने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भंग होत आहे का हा तिसरा मुद्दाही कोर्ट तपासणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण