Jalalabad Renamed News: उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराला नवे नाव मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या मंत्रालयाने या नामांतराला परवानगी दिली असून, जलालाबाद शहराच्या नामांतरांचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नामांतराला परवानगी दिल्यानंतर केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात असलेल्या जलालाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला होता. जलालाबाद शहराचे नामांतर परशुरामपुरी करण्याचा हा प्रस्ताव होता.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या मंत्रालयाने जलालाबाद शहराचे परशुरामपुरी नामांतर करण्याला परवानगी दिली आहे. त्यासंदर्भातील पत्र उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहे.
सनातन समाजासाठी गर्वाचा क्षण
केंद्र सरकारने जलालाबाद शहराच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय जितीन प्रसाद यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली. यात त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाचे पत्रही शेअर केले आहे.
'उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्ह्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्याला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मनापासून आभार आणि अभिनंदन. या निर्णयाने संपूर्ण सनातनी समाजाला एक गर्वाचा अनुभवायला मिळाला आहे. भगवान परशुराम यांना दंडवत', असे प्रसाद यांनी म्हटले आहे.