शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मतदानाचा मुहूर्त ठरला; ४ जूनला होणार फैसला! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 07:21 IST

यावेळी ४ राज्यांतील विधानसभा व विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. ९७ कोटी मतदार देशात सत्तेत कोण असेल, याचा फैसला घेईल आणि त्याचा निकाल लागेल तो ४ जून रोजी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट, लोकप्रियता अन् दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या इंडिया आघाडीची एकमूठ यांची आजपासून ८३ दिवस सत्वपरीक्षा होणार आहे.

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेतोय, तुम्हीही मतदानासाठी या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ४ राज्यांतील विधानसभा व विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबरच संपूर्ण देशभरात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात झाली असून, कोणाची ‘लाट’ येते आणि कोणाला ‘न्याय’ मिळतो, हे ४ जूनला समजेल.

लोकशाहीचा महोत्सव

  • १९ एप्रिलला पहिला तर १ जूनला अंतिम टप्पा
  • दिव्यांग, ८५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी घरून मतदानाची सोय
  • मतदान केंद्रांवर स्वयंसेवक, व्हीलचेअर्स 
  • ‘मनी पॉवर’चा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
  • राजकीय पक्ष आणि वाचाळवीरांसाठी नियमावली जाहीर
  • अफवा, चुकीची माहिती पसरविल्यास कठोर कारवाई
  • तक्रार मिळताच १०० मिनिटांत पथक पोहोचेल घटनास्थळी
  • १२ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त
  • आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल, सिक्कीममध्ये सोबतच विधानसभाही
  • देशातील २६ विधानसभा पोटनिवडणुकांचेही मतदान

कधी होणार, कुठे मतदान?

  • टप्पा १ - १९ एप्रिल - राज्य २१ / केंद्रशासित प्रदेश १०२

राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ५ , मध्य प्रदेश - ६, छत्तीसगड - १, तामिळनाडू - ३९, लक्षद्वीप - १, राजस्थान - १२, उत्तराखंड - ५, उत्तर प्रदेश - ८, जम्मू-काश्मीर - १, पश्चिम बंगाल - ३, सिक्किम - १, मेघालय - २, अरुणाचल प्रदेश - २, नागालँड -१, मणिपूर - २, मिझाेराम - १, त्रिपुरा -१, आसाम - ५, बिहार - ४, अंदमान आणि निकाेबार - १, पुडुच्चेरी - १.

  • टप्पा २ - २६ एप्रिल - राज्य १३ / केंद्रशासित प्रदेश ८९

राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ८, मध्य प्रदेश - ७, छत्तीसगड - ३, केरळ - २०, कर्नाटक - १४, राजस्थान - १३, जम्मू-काश्मीर - १, उत्तर प्रदेश - ८, बिहार - ५, पश्चिम बंगाल - ३, आसाम - ५, मणिपूर - १, त्रिपुरा - १.

  • टप्पा ३ - ७ मे - राज्य १२ / केंद्रशासित प्रदेश ९४

राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ११, गाेवा - २, कर्नाटक - १४, गुजरात - २६, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव - २, मध्य प्रदेश - ८, छत्तीसगड - ७, उत्तर प्रदेश - १०, जम्मू-काश्मीर - १, बिहार - ५, पश्चिम बंगाल - ४, आसाम - ४.

  • टप्पा ४ - १३ मे - राज्य १० / केंद्रशासित प्रदेश ९६

राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ११, मध्य प्रदेश - ८, तेलंगणा - १७, आंध्र प्रदेश - २५, ओडिशा - ४, जम्मू-काश्मीर - १, उत्तर प्रदेश - १३, बिहार - ५, झारखंड - ४, पश्चिम बंगाल - ८.

  • टप्पा ५ - २० मे - राज्य ८ / केंद्रशासित प्रदेश ४९

राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - १३, उत्तर प्रदेश - १४, जम्मू-काश्मीर - १, लडाख - १, ओडिशा - ५, झारखंड - ३, पश्चिम बंगाल - ७, बिहार - ५.

  • टप्पा ६ - २५ मे - राज्य ७ / केंद्रशासित प्रदेश ५७

राज्य आणि मतदारसंघ - उत्तर प्रदेश - १४, हरयाणा - १०, ओडिशा - ६, पश्चिम बंगाल - ८, झारखंड - ४, बिहार - ८, दिल्ली - ७.

  • टप्पा ७ - १ जून - राज्य ८ / केंद्रशासित प्रदेश ५७

राज्य आणि मतदारसंघ - उत्तर प्रदेश - १३, ओडिशा - ६, पश्चिम बंगाल - ९, बिहार - ८, झारखंड - ३, पंजाब - १३, हिमाचल प्रदेश - ४, चंडिगड - १.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग