शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

सत्तेचा सुप्रीम संघर्ष कायम! शिवसेना वि. शिंदे सेना, न्यायालयात काल काय झाले, आज काय होणार? एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:34 IST

ठाकरेंचा युक्तिवाद : बंडखोरांना अभय म्हणजे कायद्याला हरताळ; शिंदेंचा दावा : असहमती दर्शविणे म्हणजे पक्षांतर नव्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या मुद्यावर पुन्हा गुरुवारी सुनावणी होईल. या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांनी विस्तारित घटनापीठाची स्थापना केली नाही. 

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. 

युक्तीवादाला उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी सुरूवात केली. ते म्हणाले की, दोन तृतीयांश आमदार वेगळे झाले तरी पक्षाचे अस्तित्व संपत नाही. विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गोष्टी आहेत. बंडखोर  अद्यापही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानतात. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अद्यापही पक्षप्रमुख आहेत. या बंडखोरांना अपात्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.

निवडणूक आयोगाकडे का गेला? यावर सरन्यायाधीशांनी मग निवडणूक आयोगाकडे जाण्याचे प्रयोजन काय? असा सवाल केला. यावर साळवे म्हणाले, येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात बीएमसीसह अनेक निवडणुका आहेत. यासाठी निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार मिळावा, यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी यावर गुरुवारी सुनावणी करण्याचे निर्देश दिले.

...तर पक्षांतरविरोधी कायद्यालाच हरताळ n घटनेच्या १० व्या सूचीप्रमाणे दोनतृतीयांश सदस्यांसह एखादा गट वेगळा झाला तरी त्या गटाला दुसऱ्या पक्षात विलिन होणे किंवा नवा पक्ष स्थापन करणे बंधनकारक आहे. n या तरतुदीकडे दुर्लक्ष करून जर या बंडखोरांना अभय दिले तर पक्षांतर विरोधी कायद्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाईल. याउलट कायद्याने पक्षांतराला कायदेशीर ठरविण्याचा हा प्रकार आहे, असे चित्र निर्माण होईल. n गुवाहाटीत बसून एक वेगळा गट स्थापन करायचा व आम्ही मूळ शिवसेना आहे, असा दावा करायचा, ही राजकीय पक्षाची कार्यप्रणाली होऊ शकत नाही.

पक्षांतर बंदी कायदा हे शस्त्र नाहीn शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी उत्तर दिले. शिवसेनेच्या नेत्याला बदलण्यासाठी काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली. हे पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या कक्षेत कसे येईल? हा मुद्दा मुळात पक्षविरोधी नाही तर पक्षाची आंतरिक बाब आहे. राजकीय पक्षात लोकशाही अभिप्रेत आहे. पक्षप्रमुखांकडे सारी सत्तासूत्रे राहणे हे योग्य नाही. n मुख्यमंत्री आमदारांनाही भेटत नव्हते. शिवसेना पक्षात आमदार असमाधानी होते. यावर सरन्यायाधीशांनी हरीश साळवे यांना हा या चर्चेचा मुद्या नाही, असे सांगितले.

काँग्रेसमध्येही दोन गट पडले होतेयावर साळवे म्हणाले, पक्षात लोकशाही राहिली पाहिजे. राजकीय पक्षात दोन गट राहू शकतात. १९६९ मध्ये काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. पक्ष प्रमुखांच्या विचाराशी असहमती दर्शविणे हे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन कसे होऊ शकते, असा युक्तीवाद साळवे यांनी केला. राजकीय पक्षातील पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही.

कोण काय म्हणाले?अभिषेक मनु सिंघवी : गेल्या २७ जूनला न्यायालयात मी व नीरज कौल उपस्थित होतो. उपाध्यक्षांना निर्णय घेण्यापासून रोखले होते. अध्यक्षांना अटकाव केला होता. त्यांचे हात बांधून ठेवले व विश्वासमत घेण्याला परवानगी देण्यात आली.महेश जेठमलानी : विधानसभेच्या निर्णयावर इथे फेरविचार करता येणार नाही. मागच्या सरकारने वर्षांपासून अध्यक्षाची निवड केली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड झाली. जर मुख्यमंत्री विश्वासमत घ्यायला तयार नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे बहुमत नाही.नीरज कौल : अपात्रतेसंबंधी निर्णयाचा अधिकार अध्यक्षांचा आहे. निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकत नाही. तुषार मेहता : मणिपूर खटल्यात अध्यक्ष निवडीसाठी न्यायालयाने वेळ दिला. हे म्हणणे योग्य नाही की, अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकारी न्यायालयाला नाही. सरन्यायाधीश : मिस्टर साळवे, तुम्ही दोन-तीन वाक्यांत नेमके निवेदन करू शकाल. ते मी नोंदवून घेतो. दिलेल्या निवेदनात दुरुस्ती करून देऊ शकता काय, उद्या दिले तरी चालेल.हरीश साळवे : मी नवे निवदेन देतो.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना