बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:37 IST2025-11-20T19:37:27+5:302025-11-20T19:37:55+5:30
बॅनर्जी म्हणाल्या, आपण सुरू असलेल्या SIR प्रक्रियेसंदर्भात यापूर्वीही वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मात्र आता परिस्थिती फारच बिघडली आह. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) हे पत्र लिहावे लागत आहे...

बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना SIR (विशेष गहन पुनरीक्षण) च्या मुद्द्यावर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, SIR प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. ही प्रक्रिया अनियोजित आणि जबरदस्तीने राबवली जात आहे, असा आरोप करत नागरिक आणि अधिकारी दोघांनाही धोक्यात टाकत आहे. ही प्रक्रिया चिंताजनक आणि धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. परिस्थिती प्रचंड बिघडली असून SIR प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.
बॅनर्जी म्हणाल्या, आपण सुरू असलेल्या SIR प्रक्रियेसंदर्भात यापूर्वीही वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मात्र आता परिस्थिती फारच बिघडली आह. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) हे पत्र लिहावे लागत आहे. मतदार यादी पुनरीक्षणाची ही प्रक्रिया मूलभूत तयारी अथवा पुरेशा नियोजनाशिवायच लोकांवर थोपली जात आहे.
"ही प्रक्रिया ज्या पद्धतीने अधिकारी आणि नागरिकांवर थोपवली जात आहे, ती केवळ अनियोजित आणि अव्यवस्थितच नाही, तर धोकादायकही आहे. मूलभूत तयारी, पुरेसे नियोजन आणि स्पष्ट संवादाच्या अभावामुळे पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण मोहीम पंगू झाली आहे. प्रशिक्षणातील त्रुटी, अनिवार्य कागदपत्रांसंदर्भात असलेली अस्पष्टता आणि कामाच्या वेळी मतदार बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) भेटण्याची 'जवळपास अशक्य' असलेली स्तिती," यांसारख्या बाबींकडे लक्ष वेधून, बॅनर्जी यांनी SIR ची संपूर्ण प्रक्रिया "संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत" झाल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे.
या SIR मधील गैरव्यवस्थापनाची "मानवी किंमत आता असहनीय झाली आहे, असे म्हणत त्यांनी जलपाईगुडी येथे बूथ-स्तरावर अधिकारी म्हणून कार्यरत एका अंगणवाडी कार्यकर्तीच्या आत्महत्येचा हवाला दिला, तसेच ती SIR संबंधित अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीमुळे मानसिकदृष्ट्या खचली होती, असे बोलले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. एवढेच नाही तर, ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकांनी आपला जीव गमावल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच, "अशा परिस्थितीत, मी तत्काळ सुधाराणा करण्यात यावी, असे आग्रही आवाहन आणि अपेक्षा करते," असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांना विनंती करताना त्या म्हणाल्या, "मी आपल्याला विनंती करेन की, आपण ही प्रक्रिया रोखण्यासाठी दखल द्यावी आणि जबरदस्तीची पावले न उचलता योग्य प्रशिक्षण आणि सहकार्य करावे. तसेच, विद्यमान पद्धत आणि वेळापत्रकाचे चांगल्या पद्दतीने बघावे."