शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 10:20 IST

सत्तासंघर्ष, पुढील सुनावणी २१ राेजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : योग्यतेच्या आधारावर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची याचिका ७ सदस्यीय घटनापीठाकडे द्यायची काय? यावर विचार केला जाईल. यासाठी येत्या २१ फेब्रुवारीला ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होईल, असा निर्णय आज सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी दिला. यामुळे हा खटला सात सदस्यीय खंडपीठाकडे जाईल, की नाही, याचा खुलासा होण्यास पुन्हा काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आले. हा खटला नबाम रेबिया निकालाच्या  संदर्भात विचारात घेतला पाहिजे, या मुख्य युक्तीवादावर सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी गुरुवारला निर्णय राखून ठेवला होता. आज सकाळी या संदर्भात निर्णय देताना सरन्यायाधीशांनी सात सदस्यीय खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यास तूर्तास नकार दिला, तरी दरवाजा बंद केलेला नाही. येत्या २१ फेब्रुवारीला होणार्या युक्तीवादा दरम्यान ‘योग्यतेच्या आधारा’वर या प्रकरणाचा नबाम रेबिया निकालासंदर्भात पुनर्विचार करावा का? याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. नबाम रेबिया प्रकरण हे अरुणाचल प्रदेशमध्ये २०१६ मध्ये  उद्भवलेल्या राजकीय संकटाशी संंबंधित आहे. ठाकरे-शिंदे वादाचा विचार हा या प्रकरणाच्या संदर्भातच घेतला जाईल, यावर स्वतंत्र विचार हाेणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

शिंदे गटाच्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी जून महिन्यात अपात्रतेची नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०२२ पर्यंत वाढविली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी २९ जून  राेजी राजीनामा दिल्याने ठाकरे सरकार कोसळले. 

काय आहे नबाम रेबिया प्रकरणnनबाम रेबिया हे अरुणाचल प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष होते. मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या विरोधात काँग्रेसच्या २१ आमदारांनी बंड केल्यानंतर नबाम रेबिया यांनी या सर्वांना अपात्रतेची नोटीस बजावली. यानंतर काही आमदारांनी रेबिया यांच्या हटविण्याची नोटीस दिली. nहटविण्यासाठी नोटीस दिलेली असताना विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेऊ शकत नाही, असा निर्णय २०१६ मध्ये पाच सदस्यीय घटनापीठाने दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ सदस्यांनाअपात्रतेची नोटीस बजावली. nयानंतर शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानसभा उपाध्यक्षांनाच हटविण्यासाठी नोटीस दिली. त्यासाठी नबाम रेबिया निकालाचा संदर्भ आमदारांच्या वतीने देण्यात आला. 

१०व्या अनुसूचीतील तरतुदींकडे वेधले लक्षयाचवेळी राज्यघटनेतील १० व्या अनुसूचीच्या तरतुदींकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे. मूळ पक्षातून फुटून निघालेल्या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते, अशी १० व्या अनुसूचीत तरतदू आहे. याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गट दुसर्या पक्षात विलीन झालेला नाही. यामुळे पीठासीन अधिकार्याचा घटनात्मक अधिकार, १० व्या अनुसूचीतील तरतूद तसेच राज्यपालांच्या अधिकारावर न्यायीक पुनर्विचार होण्याची गरज असल्याने या याचिकेची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, हा ठाकरे गटाचा मुख्य युक्तीवाद आहे.

टॅग्स :Courtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना