शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

बिहारमध्ये आता सुरू झाला खरा 'खेला'; तेजस्वी यांच्या घरी कशासाठी पोहोचले एवढे पोलीस?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 11:47 PM

Bihar Politics: ...यानंतर एसडीएम आणि एसपी तेजस्वी यादव यांच्या निवास्थानी पोहोचले, असे सांगण्यात येत आहे. 

बिहारमध्ये फ्लोर टेस्ट होण्यापूर्वी राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. बिहार पोलीस रविवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे माजी उपमुख्यमंत्री तथा आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या निवासस्थानाबाहेरील परिसराला छावणीचे स्वरूप आले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याशिवाय या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एसडीएम आणि एसपी सिटी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. पोलीस पोहोचल्यानंतर, तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर आरजेडी नेते संतप्त होऊन घोषणाबाजी करू लागले. जेव्हा पोलीस तेथून बाहेर पडले, तेव्हा, आरजेडी समर्थकांनी त्यांच्या वाहनामागे धावात घोषणाबाजी केली.

खरे तर, आरजेडी आमदार चेतन आनंद यांच्या लहान भावाने, आपल्या भावाला तेजस्वी यादव यांनी हाऊस अरेस्ट केल्याची  तक्रार पोलिसांत नोंदवली होती. यानंतर एसडीएम आणि एसपी तेजस्वी यादव यांच्या निवास्थानी पोहोचले, असे सांगण्यात येत आहे. 

चेतन आनंद हे बाहुबली आनंद मोहन यांचे पुत्र आहेत. तेजस्वी यादव यांच्या बंगल्यावर शनिवारी आरजेडी आमदारांची बैठक पडली. यानंतर फ्लोअर टेस्ट होईपर्यंत आमदारांना तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानीच राहण्यास सांगण्यात आले. या आमदारांच्या बॅग आणि कपडेही त्यांच्याच निवासस्थानी मागवण्यात आले. यानंतरच चेतन आनंद यांचा लहान भाऊ अंशुमन आनंद यांनी पोलिसांत एफआयआर दाखल करत, त्यांच्या भावाला तेजस्वी यादव यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले होते.

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव