शिकार येतेय... पुंछ हल्ल्यापूर्वी लपून करत होते प्रतीक्षा; ‘ती’ छायाचित्रे समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 08:50 IST2023-04-26T08:50:10+5:302023-04-26T08:50:46+5:30
पीएएफएफने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पुंछमधील सुरनकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतरही असेच फोटो प्रसिद्ध केले होते

शिकार येतेय... पुंछ हल्ल्यापूर्वी लपून करत होते प्रतीक्षा; ‘ती’ छायाचित्रे समोर
श्रीनगर : पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यापूर्वी दहशतवादी ‘शिकार’ची प्रतीक्षा करत होते, असे आता समोर आले आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या संघटनेने हल्ल्यापूर्वीची दोन छायाचित्रे २४ एप्रिल रोजी जारी केली.
पीएएफएफचा प्रवक्ता तन्वीर अहमद राथेर याने हे फोटो जारी केले. पहिल्या छायाचित्रात लिहिले की, भरदिवसा शिकारची प्रतीक्षा... दुसऱ्या छायाचित्राखाली म्हटलेय की, ती पहा.. शिकार येतेय...
पीएएफएफने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पुंछमधील सुरनकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतरही असेच फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावर लिहिले होते - लवकरच येत आहे... याचा अर्थ दहशतवादी हल्ला लवकरच होईल, असे संकेत त्यांनी दिले होते.
‘त्या’ हल्ल्याची कॉपी
पूंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर नुकताच झालेला हल्ला जवळपास २२ वर्षांपूर्वी शेजारच्या राजौरी जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच आहे, असे सांगत सुरक्षा अधिकाऱ्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
दुकानदारावर झाडल्या गोळ्या
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी एका दुकानदारावर गोळ्या झाडून त्याला जखमी केले.