शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

तंत्रज्ञानाबाबत उदासीनतेमुळे गरिबांनी सोसला सर्वाधिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी : दोनदिवसीय भारत ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   २०१४ पूर्वी शासनात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत उदासीनता होती; त्यामुळे  गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक त्रास सोसावा लागला. विद्यमान सरकारने ड्रोनसह अन्य तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशातील  सर्वांत मोठ्या ‘भारत ड्रोन महोत्सवा’च्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.  ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना माझे असे स्वप्न आहे की, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असावा. प्रत्येक शेतात एक ड्रोन आणि प्रत्येक घरात समृद्धी असावी. भारतात ड्रोन तंत्रज्ञानाबाबत असलेला उत्साह अद्भुत आहे. हे उदयोन्मुख क्षेत्रात रोजगार निर्मितीचे संकेत देते. एक काळ असा होता की, लोकांना रेशन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहायचे. गेल्या सात ते आठ वर्षांत ही समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करण्यात आली.  पूर्वी असा समज होता की, तंत्रज्ञान आविष्कारांवर उच्चभ्रू लोकांचाच अधिकार आहे; परंतु,  आज आम्ही  हे सुनिश्चित करीत आहोत की,  कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा लाभार्थी सर्वांत आधी जनताच व्हावी. ड्रोन तंत्रज्ञान याचे उदाहरण आहे.राजधानी दिल्लीत २७ मेपासून दोन दिवस भारत ड्रोन महोत्सव (२०२२) आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाला केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आणि ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह उपस्थित होते.

या क्षेत्रात होणार ड्रोनची मदतकृषी, क्रीडा, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढेल. कुंभमेळा किंवा इतर माेठ्या आयाेजनांच्यावेळी ड्राेनची खूप मदत हाेणार आहे. तसेच वाहतूक काेंडी झाल्यावरही ड्राेनची मदत घेता येईल, असे पंतप्रधान माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान