पोलिसांनीच पोलिसांवर केला लाठीमार, रांचीमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 17:40 IST2024-07-19T17:38:38+5:302024-07-19T17:40:13+5:30
Police Lathi charged On Assistant Police: झारखंडची राजधानी रांची येथे आज पोलिसांनी पोलिसांवरच लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनीच पोलिसांवर केला लाठीमार, रांचीमधील धक्कादायक प्रकार
झारखंडची राजधानी रांची येथे आज पोलिसांनीपोलिसांवरच लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सहाय्यक पोलीस कर्मचारी आपल्या मागण्यांबाबत आंदोलन करत होते. हे आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाऊ लागले होते. त्यांना रोखण्यावरून वाद वाढला. त्यानंतर पोलिसांनी या सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला.
झारखंडमधील १२ नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील एकूण २५०० सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांची सन २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सरकारने तेव्हा या कर्मचाऱ्यांसाठी १० हजार रुपयांचं मानधन निश्चित करण्यात आलं होतं. तसेच सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदावर नियुक्त झालेल्यांना ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सेवेत कायम करण्यात आलं नाही. त्यामुळे राज्याभरातील २५०० कर्मचारी हे आंदोलन करत आहेत. तसेच त्यांना संप पुकारला आहे. हे आंदोलक आंदोलन करत असतानाच हा लाठीमार झाला आहे.