Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:48 AM2022-05-13T05:48:47+5:302022-05-13T05:48:47+5:30

नवी दिल्लीतील घटना : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण

The plane was 'missed' due to denial of entry, the woman had a 'panic attack', Air India says on viral video | Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने एका मध्यमवर्गीय महिलेला ‘पॅनिक अटॅक’ आला आणि ती बोर्डिंग गेटसमोरच जमिनीवर पडली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग गेटमधून प्रवेश करू न दिल्याने घाबरल्यामुळे महिलेसोबत ही घटना घडली, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

वैद्यकीय मदत नाही, उलट विमानतळावरुन जाण्यास सांगितले
महिला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर सिक्युरिटी गेटमधून चेक-इन करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आधीच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे वेळेत चेक-इन करण्यासाठी मदत मागितली. पण, ते आमचं काम नाही असं म्हणत कर्मचाऱ्यांनी नकार दिला. 
अखेरीस चेक-इन केल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधून आमच्या सोबत हृदय आणि मधुमेहाची रुग्ण असलेली महिला आहे, त्यामुळे आम्हाला बोर्डिंग गेटपर्यंत पोहोचण्यास ५ मिनिटे लागतील असे कळवले. पण तरीही बोर्डिंग गेट बंद करण्यात आला आणि आम्हाला प्रवेश नाकारला. 
महिलेच्या मुलाची त्याच दिवशी अंतिम परीक्षा होती, त्याबाबत विचार करुन त्यांना पॅनिट अटॅक आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. शिवाय वैद्यकीय मदत देण्याऐवजी विमानतळावरून निघून जा, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. 

बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण महिला आणि दोन प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते, असे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले आहे. 


...तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाही
n    बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्या तीन प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण ते प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते. 
n    महिलेला जमिनीवर पडल्याचं बघताच लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना बरे वाटू लागले आणि त्यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा व्हीलचेअर मदत नाकारली. 
n    एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. तथापि, एक जबाबदार विमान कंपनी म्हणून, आम्ही नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते आणि कोणत्याही परिस्थितीत, विशेषत: सर्व प्रवासी वेळेवर आले असतील तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाही.

Web Title: The plane was 'missed' due to denial of entry, the woman had a 'panic attack', Air India says on viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.