दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:09 IST2025-07-23T06:08:21+5:302025-07-23T06:09:27+5:30

हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय ३१५ च्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली.

The plane suddenly caught fire as soon as it landed in Delhi | दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप

दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय ३१५ च्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली. विमानातील सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

विमानतळावर लँडिंग झाल्यानंतर गेटवर विमान पार्क केल्यानंतर ही घटना घडली. त्या वेळी प्रवाशांचे उतरणे सुरू झाले होते. आग लागल्यानंतर यंत्रणेच्या अंतर्गत प्रणालीनुसार ऑक्झिलरी पॉवर युनिट आपोआप बंद झाले, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

प्रवासी सुखरूप असल्याचा दावा 
"विमानाच्या काही भागांना नुकसान झाले आहे, मात्र सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उतरण्यात यश आले. यात कोणीही जखमी झालेले नाही," अशी माहिती प्रवक्त्याने दिली. सध्या पुढील तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले असून, या घटनेची माहिती नियामक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.

Web Title: The plane suddenly caught fire as soon as it landed in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.