योगी आदित्यनाथ यांनी ज्याचे कौतुक केले तो नावाडी निघाला चक्क हिस्ट्रीशीटर; २१ गुन्हे नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:21 IST2025-03-07T09:21:01+5:302025-03-07T09:21:42+5:30
योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत ज्या नावाड्याची ‘सक्सेस स्टोरी’ ऐकविली तो नावाडी ‘हिस्ट्रीशीटर’ निघाला असून, त्याच्यावर एकूण २१ गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ज्याचे कौतुक केले तो नावाडी निघाला चक्क हिस्ट्रीशीटर; २१ गुन्हे नोंद
राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत प्रयागराजमधील ज्या नावाड्याची ‘सक्सेस स्टोरी’ ऐकविली तो नावाडी पिंटू महरा ‘हिस्ट्रीशीटर’ असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर हत्येसह एकूण २१ गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाकुंभमध्ये पिंटू आणि त्याच्या कुटुंबीयांनी ३० कोटी कमाविल्याचा दावा योगी यांनी त्याचे नाव न घेता केला होता. नंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यम विभागाने पिंटूचा फोटो व व्हिडीओसह ही स्टोरी प्रसिद्धीस दिली होती. तेव्हा सर्वांना योगींनी ज्याचा उल्लेख केला तो नावाडी पिंटू महरा असल्याचे समजले.
२००९मध्ये अरैलतील दुहेरी हत्याकांडात तो आरोपी आहे. त्याचा पिता आणि दोन भाऊ पण हिस्ट्रीशीटर आहेत.