पुस्तक समोर ठेवून पेपर लिहा; याचा फायदा आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:03 IST2025-08-15T09:02:38+5:302025-08-15T09:03:06+5:30
हाँगकाँगने पहिल्यांदा १९५३ मध्ये ओपन-बुक पद्धतीला सुरू केले.

पुस्तक समोर ठेवून पेपर लिहा; याचा फायदा आहे?
नवी दिल्ली: विद्यार्थ्यांची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, सीबीएसई २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ९ वीसाठी ओपन बुक परीक्षा प्रणाली लागू करण्याची तयारी करत आहे. ही परीक्षा रट्टा मारण्याच्या शिक्षणापेक्षा विषयांच्या सखोल आकलनाला प्राधान्य देईल. ही परीक्षा काय आहे, ते आपण समजून घेऊया
ओपन-बुक परीक्षा म्हणजे काय ?
यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पुस्तके, वर्गात काढलेल्या नोट्स किंवा इतर मान्यताप्राप्त साहित्य वापरता येते. योग्य माहिती कुठे शोधावी आणि ती कशी समजून घ्यावी, हे यात एक आव्हान आहे.
जगाने ही पद्धत स्वीकारली का?
हाँगकाँगने पहिल्यांदा १९५३ मध्ये ओपन-बुक पद्धतीला सुरू केले. १९५१-१९७८ दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनमध्ये त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. निकालांनी रट्टा मारून अभ्यास करण्याऐवजी समजून घेण्यास प्रोत्साहन दिले. यामध्ये कमकुवत विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.
भारतात ही पद्धत नवीन?
२०१४ मध्ये, सीबीएसईने श्वी आणि ११वीच्या वर्गासाठी ओपन टेक्स्ट बेस्ड असेसमेंट सुरू केली होती. विद्यार्थ्यांना ४ महिने आधीच साहित्य देण्यात आले.
२०१७-१८ मध्ये फारसे यश न आल्याने ही योजना बंद करण्यात आली.
२०१९ मध्ये, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये याला मान्यता दिली.
कोरोना काळात डीयू, जामिया, जेएनयू, एएमयू आणि अनेक आयआयटीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या.
सीबीएसईची मान्यता का?
शाळांमध्ये मूल्यांकन करण्याच्या पद्धतीत मोठ्या बदलाचा हा भाग.
नवीन शिक्षण धोरणात रहे मारून शिकण्यापेक्षा शिकण्यावर, समजून घेण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
सध्याच्या परीक्षा रहे मारून शिकण्याचे मोजमाप करतात किंवा भीती निर्माण करतात, असे एनसीईआरटी म्हणते.
विद्यार्थ्यांना कसा फायदा?
ही परीक्षा पद्धती अशा विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे ज्यांना विषय समजून घ्यायचा आहे. यामुळे ज्ञान जीवनात कसे वापरता येईल हे जाणून घेण्याची आणि दाखविण्याची संधी मिळेल.