कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:18 IST2025-06-30T18:17:28+5:302025-06-30T18:18:07+5:30

या प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे.

The main accused in the Kolkata rape case turns out to be a 'history sheeter'; Monojit already has major crimes registered against him! | कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कोलकाता लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्काराचा मुद्दा तापू लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी कोलकाता साउथ लॉ कॉलेजमध्ये टीएमसी (TMC) विद्यार्थी नेता मोनोजित मिश्रा याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे. याशिवाय, जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) हे अन्य आरोपी आहेत. ही घटना कॉलेजमधील गार्ड रूममध्ये घडल्याने पोलिसांनी गार्डलाही अटक केली आहे. पोलीस तपासामध्ये मोनोजित मिश्रावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल
एका अहवालानुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रावर लैंगिक अत्याचार, मारहाण, तोडफोड आणि चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोलकातामध्ये मोनोजित हा 'हिस्ट्रीशीटर' म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर कालीघाट, कसबा, अलीपूर, हरिदेवपूर आणि टॉलीगंज पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी कॉलेज परिसरात एका महिलेचे कपडे फाडल्याचा आरोपही मोनोजितवर होता.

कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत
मोनोजित मिश्रा सध्या कॉलेजचा नियमित विद्यार्थी नाही. उप-प्राचार्यांनी सांगितले की, मोनोजित कॉलेजमध्ये 'कॅज्य्युअल' आधारावर काम करत होता. कॉलेज गव्हर्निंग बॉडीने त्याला नुकतेच कंत्राटी तत्वावर भरती केले होते. या कॉलेज गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष तृणमूल काँग्रेसचे आमदार अशोक कुमार देब आहेत.

तृणमूल काँग्रेसने मोनोजितपासून घेतली फारकत!
मोनोजित हा टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणात जेव्हापासून टीएमसीचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून विरोधी पक्ष सरकारला घेरण्यात व्यस्त आहेत. सामान्य जनतेतही या घटनेमुळे संताप दिसून येत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, आता टीएमसीने मोनोजितपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. टीएमसीपीचे प्रदेशाध्यक्ष त्रिनंकुर भट्टाचार्जी यांनी सांगितले की, मोनोजितला टीएमसीपीच्या दक्षिण कोलकाता जिल्ह्यात सर्वात खालचे पद देण्यात आले होते आणि २०२२ मध्ये त्याचे नाव नवीन समितीत समाविष्ट केले नव्हते.

Web Title: The main accused in the Kolkata rape case turns out to be a 'history sheeter'; Monojit already has major crimes registered against him!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.