फुटबॉल मैदानावर पेनल्टी शूटआऊट सुरु असतानाच वीज पडली; दोन खेळाडूंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 21:20 IST2024-08-29T21:19:56+5:302024-08-29T21:20:08+5:30
दोन गावांमध्ये फुटबॉल मॅच सुरु होती. बरीखाप आणि लेडाई गावांच्या संघात हा सामना सुरु होता.

फुटबॉल मैदानावर पेनल्टी शूटआऊट सुरु असतानाच वीज पडली; दोन खेळाडूंचा मृत्यू
झारखंडच्या लातेहारमध्ये फुटबॉल मैदानावर खेळ सुरु असताना वीज कोसळली आहे. यामध्ये दोन खेळाडूंचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. मदरसा स्मशान घाटाच्या मैदानात ही दुर्घटना घडली आहे.
दोन गावांमध्ये फुटबॉल मॅच सुरु होती. बरीखाप आणि लेडाई गावांच्या संघात हा सामना सुरु होता. यावेळी पेनल्टी शूटआऊट सुरु होता. यामुळे सर्व खेळाडू एकमेकांना कव्हर करण्यासाठी एकत्र आले होते. पेनल्टी शूटआऊट संपताच अचानक या खेळाडूंवर वीज कोसळली.
या विजेच्या दुर्घटनेत एका गायीचा देखील मृत्यू झाला आहे. पोलिसांनी खेळाडूंचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.