शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

The Kashmir Files: "द काश्मीर फाईल्स न पाहणाऱ्यास 2 वर्षे जेल अन् टीकाकारांना जन्मठेप करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:10 IST

द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी मोठं विधान केलं आहे. 

द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. तर, पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी उपरोधात्मक टिका केली आहे. ''संसदेत कायदा संमत करुन हा चित्रपट न पाहणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करायला हवी. केवळ संपू्र्ण भारतात हा चित्रपट टॅक्स फ्री करुन चालणार नाही, तर प्रत्येक भारतीयास हा चित्रपट पाहणे बंधनकारक करायला हवं,'' असेही सिन्हा यांनी ट्विट करुन म्हटले.    तसेच, काश्मीर फाईल्स हा चित्रपट न पाहणाऱ्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि या चित्रपटावर टिका करणाऱ्यांना जन्मठेप करण्यात यावी, असेही यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये उपरोधात्मकपणे म्हटले आहे. दरम्यान, मोहन भागवत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भागवत यांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबतचे मत मांडले. सध्याच्या घडीला या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत.

द काश्मीर फाईल्स बद्दल काय म्हणाले मोदी

देशातील बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(PM Narendra Modi) या सिनेमावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला. 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सYashwant Sinhaयशवंत सिन्हाcinemaसिनेमाjailतुरुंग