शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 20, 2024 14:02 IST

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदिगड : पंजाबमध्ये १३ जागांसाठी लोकसभेचा रणसंग्राम सुरू असून, केंद्रातील सत्ताधारी भाजपसह पंजाबमधील सत्ताधारी आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. २० लाख शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व १३ जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे २०१९ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला गळती लागल्याने स्वकियांशीच लढावे लागत आहे.

२३ पिकांना कायद्याने एमएसपीची  गॅरंटी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक रोष सत्ताधारी भाजपावर आहे. भाजपाच्या उमेदवारांना प्रचारासाठीही शेतकरी मतदार संघात फिरू देत नसल्याची सध्याचे स्थिती आहे. दुसरीकडे पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीने एमएसपी जाहीर करण्याचे तसेच पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांवरही शेतकऱ्यांची नाराजी आहे.

पंजाबमध्ये  २० लाख शेतकरी मतदार आहेत. या अन्नदात्याची नाराजी दूर करण्यासाठी या सगळ्याच पक्षांच्या पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अनेक नेत्यांनी साेडली काँग्रेसची साथ २०१९ च्या निवडणुकीमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला यावेळेस मात्र स्वकीय यांनीच पछाडले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, पटियालाचे खासदार तथा माजी मंत्री परीनीत कौर, तीन वेळा खासदार असलेले रवनितसिंह बिट्टू अशी दिग्गज मंडळी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये दाखल झाली आहे. याशिवाय आमदार राजकुमार चब्बेवाल, आमदार गुरुप्रीतसिंह जीपी यांनीही काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसला पंजाबमध्ये सध्या स्वकीयांसोबतच लढाई करण्याचे माेठे आव्हान आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPoliticsराजकारणFarmerशेतकरी