‘अल निनो’ने टाकली शस्त्रे, यंदा बरसणार धो-धो पाऊस; जागतिक हवामान संस्थांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:27 AM2024-02-12T06:27:05+5:302024-02-12T06:27:32+5:30

आनंदवार्ता! जून-जुलैपर्यंत ‘ला निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले.

The impact of 'El Nino' will end by June this year, hopes to heavy rain the scientists of the Meteorological Department have predicted | ‘अल निनो’ने टाकली शस्त्रे, यंदा बरसणार धो-धो पाऊस; जागतिक हवामान संस्थांचा अंदाज

‘अल निनो’ने टाकली शस्त्रे, यंदा बरसणार धो-धो पाऊस; जागतिक हवामान संस्थांचा अंदाज

नवी दिल्ली : २०२३ हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरल्यानंतर ‘अल निनो’चा प्रभाव यावर्षी जूनपर्यंत समाप्त होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा दमदार पावसाच्या आशा उंचावल्या आहेत.

किमान दोन जागतिक हवामान संस्थांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले की, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा अल निनो कमकुवत होऊ लागला आहे. ऑगस्टपर्यंत ‘ला नीना'ची स्थिती निर्माण होऊ शकते.  या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी जून-ऑगस्टपर्यंत ‘ला निना’ परिस्थिती निर्माण झाल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असे म्हटले आहे. जून-जुलैपर्यंत ‘ला निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले.

काय आहे अल निनो?
अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याची प्रक्रिया. ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे देशात मान्सूनचे चक्र विस्कळीत होते. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.

मान्सून देताे ७०% पाऊस 
भारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे ७०% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमधून येतो, जो कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. जीडीपीमध्ये त्याचा वाटा सुमारे १४% आहे. देशाच्या १.४ अब्ज लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांना यातून रोजगार मिळतो.

Web Title: The impact of 'El Nino' will end by June this year, hopes to heavy rain the scientists of the Meteorological Department have predicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस