जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:01 IST2025-10-05T19:00:40+5:302025-10-05T19:01:48+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये चिमुकल्यांमध्ये जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच असून, कफ सिरप पिल्याने मुलांचा मृत्यू होण्याची मालिका थांबलेली नाही. छिंदवाडानंतर आता बैतूल जिल्ह्यात कफ सिरपमुळे २ मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
मध्य प्रदेशमध्ये चिमुकल्यांमध्ये जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच असून, कफ सिरप पिल्याने मुलांचा मृत्यू होण्याची मालिका थांबलेली नाही. छिंदवाडानंतर आता बैतूल जिल्ह्यात कफ सिरपमुळे २ मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यू हा किडनी फेल झाल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मुलांवर डॉ. प्रवीण सोनी यांनी उपचार केले होते. दोन्ही मुलांना कोल्ड्रिफ कफ सिरप देण्यात आले होते, अी माहिती समोर येत आहे. दरम्यान, बैतूलजवळील छिंदवाडा येथे कफ सिरप पिल्याने १४ मुलांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, छिंदवाडा येथे कफ सिरप पिल्याने मुलांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवी सुरू केली आहे. आतापर्यंत १४ मुलांचा मृत्यू झाला असून, या सर्व प्रकरणामध्ये पीडितांच्या नातेवाईकांना मदत देण्यात आली आहे, असे एडीएम धीरेंद्र सिंह यांनी सांगितले. याशिवाय आणखी ८ मुले छिंदवाडा येथील नागपूर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर एक टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यात डॉक्टरांसह कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एडीएम धीरेंद्र सिंह यांनी पुढे सांगितले की, ड्रग कंट्रोलरचं एक पथक तयार करण्यात आलं असून, ते कोल्ड्रिफ कफ सिरपचा शोध घेण्यासाठी छापेमारी आणि जप्ती अभियान राबवत आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, तपास पूर्ण होईपर्यंत या सिरपच्या पुरवठ्यावर अधिक सखोलपणे लक्ष ठेवलं जात आहे.