सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:31 IST2025-04-16T19:30:45+5:302025-04-16T19:31:13+5:30
पोलीसांनी या जोडीला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ते सापडत नव्हते. अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. आता त्यांना अलिगडला आणण्यात येणार आहे.

सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
सध्या उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्हा, हा एका अनोख्याच प्रकरणाने चर्चेत आहे. ही चर्चा आहे, 'होणाऱ्या सासू आणि होणाऱ्या जावयाच्या लव्ह स्टोरीची'. येथे एक महिला आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. मात्र आता या लव्ह स्टोरीचा दी एंड होताना दिसत आहे. पोलिसांनी नेपाल सीमेजवळून या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, सासूने रडत-रडत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलीसांनी या जोडीला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ते सापडत नव्हते. अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. आता त्यांना अलिगडला आणण्यात येणार आहे.
महिलेनं केला असा खुलासा -
माध्यमांतील वृत्तानुसार, चौकशीदरम्यान सपना म्हणाली, आपला नवरा दारू पिऊन आपल्याला नेहमी मारहाण करत होता. मुलीचे लग्न राहुलशी ठरल्यानंतर, जेव्हा जेव्हा राहुलचा फोन यायचा, तेव्हा आपण राहुलसोबत बोलायचो, यावरून आपली मुलगीही वेगवेगळे आरोप करत असे. पतीही शिवीगाळ करत असे आणि राहुलसोबत पळून जाण्याची धमकी देत असे. यामुळे आपण राहूल सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तीने, आपल्याला मडराक पोलीस ठाण्यात नेऊ नये, आपल्याला दादों पोलीस ठाण्याची मदत मिळावी आहे, अशी विनंतीही पोलीस अधिकाऱ्यांना केली असेल्यचे एसपी ग्रामीण अमृत जैन यांनी सांगितले.
कसा कसा केला प्रवास? -
दरम्यान, प्रियकर राहुलची चौकशी केली असता, "सपना एप्रिलमध्ये अलीगढहून कासगंजला आली, यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बरेलीला पोहोचलो. यानंतर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोहोचलो. तेथे मी माझा मोबाईल बघितला, तर सोशल मीडियावर आमचीच चर्चा सुरू होती. हे लक्षात घेत आम्ही झफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. तेथून बसने आलो आणि राया कट येथे उतरलो आणि तेथून गाडी भाड्याने घेऊन पोलीस ठाण्यात आलो.