शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:50 IST

सॅटेलाइट फोटोंवरून खुलासा झाला आहे की, चीनने गेल्या आठ वर्षांमध्ये भूतानच्या या पारंपरिक भागात किमान 22 गावे आणि वस्त्या वसवल्या आहेत.

लडाखच्या पूर्व भागातील भारत आणि चीनचे सैन्य माघारी घेण्यासंदर्भातील करारानंतर, द्विपक्षीय संबंध पुनर्स्थापित करण्यासंदर्भात बुधवारी (28 डिसेंबर 2024) एक बैठक पार पडली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ड्रॅगनची शेपटी वाकडी ती वाकडीच आहे. तो डोकलाम परिसरात गावे वसवत आहे. हा भू-भाग पारंपरिकदृष्ट्या भूतानचा आहे. 

डोकलाम भागात 22 गावं वसवली -सॅटेलाइट फोटोंवरून खुलासा झाला आहे की, चीनने गेल्या आठ वर्षांमध्ये भूतानच्या या पारंपरिक भागात किमान 22 गावे आणि वस्त्या वसवल्या आहेत. तसेच डोकलामच्या जवळपास गावे वसवण्याचे काम वर्ष 2020 पासून सुरू आहे. येथे आतापर्यंत 8 गावे वसवण्यात आली आहेत. भूतानच्या पश्चिमी भागात वसवली गेलेली ही गावे रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. ही गावे एक खोऱ्याला लागून आहेत. ज्यांवर चीन आपला अधिकार असल्याचे सांगतो. येथून चीनच्या सैन्य छावण्या अत्यंत जवळ आहेत.

भारताचं टेन्शन वाढवलं - चीनने जी 22 गावे वसवली आहेत, त्यांतीस सर्वात मोठे जे गाव आहे, त्याचे नाव आहे जीवू. जे पारंपरिक भूतानी चरागाह त्सेथांखखावर वसवण्यात आले आहे. चीनच्या या कृत्याने भारताचे टेन्शन वाढवले आहे. या भागात चीनची स्थिती मजबूत झाल्याने सिलीगुडी कॉरिडोरच्या (ज्याला चिकन नेकही म्हटले जाते) सुरक्षिततेला धोकाही निर्माण झाला आहे. हा कॉरिडोर भारताला इशान्य राज्यांसोबत जोडतो.

डोकलाम भागात 2017 मध्ये हस्तक्षेप करून भारताने तेथे रस्ते आणि इतर सुविधांचे बांधकाम थांबवले होते. यामुळे भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यांत 73 दिवस संघर्ष सुरू होता. अखेरीस दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. आता गेल्या काही वर्षांपासून चीनने पुन्हा एकदा डोकलामच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये बांधकामे वाढवली आहेत. मात्र, अलिकडच्या वर्षांतच, भूतानच्या अधिकाऱ्यांनी भूतानच्या भूभागात चिनी वसाहतींचे अस्तित्व नाकारले होते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBhutanभूतानXi Jinpingशी जिनपिंगNarendra Modiनरेंद्र मोदी