शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Hyderabad: सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 14,000 महिला अडकल्या होत्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 14:50 IST

सायबराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेटशी संबंधित 18 जणांना अटक केली आहे.

हैदराबाद: सायबराबाद पोलिसांनीसेक्स रॅकेटशी संबंधित 18 जणांना अटक केली आहे. मागील काही वर्षांपासून यांनी तब्बल 14,000 हजारांहून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात फसवले होते. सायबराबाद पोलिसांनी अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा (sex Racket) पर्दाफाश केला. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रमुख सूत्रधारांना बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील काही वर्षांत भारतातील 15 शहरांमध्ये 14,000 हून अधिक महिला आणि काही परदेशी नागरिकांवर लैंगिक अत्याचार केले. या टोळीकडून आरोपी महिलांचा अमली पदार्थ विक्रीसाठी देखील वापर केला जात होता. लक्षणीय बाब म्हणजे ही टोळी एवढी सक्रिय होती की त्यांनी ग्राहकांना आमिष दाखवण्यासाठी बंगळुरू आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे कॉल सेंटर सुरू केले होते.

सेक्स रॅकेटचा पर्दाफाशटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सायबराबाद आणि हैदराबादमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनमध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत 37 प्रकरणे नोंदवण्यात आली. या माध्यमातून पर्यटक व्हिसावर असलेल्या अर्धा डझन परदेशी लोकांसह 120 जणांची सुटका करण्यात आली. मुख्य आरोपींपैकी एक दररोज जवळपास 30,000 रुपये नफा कमवत होता. तर महिलांना कमाईच्या 30% रक्कम दिली जात होती. माहितीनुसार, या टोळीतील सुमारे 50% पीडित महिला पश्चिम बंगालमधील आहेत. या पाठोपाठ कर्नाटकातील 20%, महाराष्ट्रातील 15% आणि दिल्लीतील 7% आहेत. तर 3% परदेशी महिलांचा समावेश असून त्या बांगलादेशातील आहेत. नेपाळ, थायलंड, उझबेकिस्तान आणि रशियातील महिलांचे काही तपशीलही पोलिसांना मिळाले आहेत.

आरोपींना घातल्या बेड्या सायबराबादचे आयुक्त एम स्टीफन रवींद्र यांनी या टोळीबद्दल सांगितले, अनंतपूर आणि बंगळुरूमधील टेलिकॉलर वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर आरोपी फोटो पोस्ट करायचे. त्यांनी सेक्स रॅकेटचे सूत्रधार आणि कमिशनसाठी ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून देखील काम केले. ज्या महिलेचा फोटो ग्राहकांना आवडला असेल, तिला खास फ्लॅट किंवा हॉटेलच्या रूममध्ये पाठवले जायचे. याची माहिती मिळताच पोलिसांनी हैदराबाद, अनंतपूर आणि बंगळुरू येथे तपास सुरू केला आणि आरोपींना ताब्यात घेतले. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सेक्स रॅकेट चालवण्यात सहकार्य करणाऱ्या डझनहून अधिक लोकांना अटक केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटhyderabad-pcहैदराबादPoliceपोलिसArrestअटक