शहरं
Join us  
Trending Stories
1
मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा
2
'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?
3
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
4
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी
5
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
6
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
7
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
8
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
9
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
10
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
11
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
12
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
13
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
14
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
15
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
16
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
17
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
18
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
19
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
20
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 

Insurance: कंपनीने काढलाय तुमचा विमा! तुम्हाला ठाऊकंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 9:10 AM

Health Insurance: गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे.

गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोईसुविधांसोबत आरोग्यविमाही काढून देतात, परंतु आजही तब्बल ८३ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने आपला आरोग्य विमा काढला आहे, हेच ठाऊक नसते. हेल्थटेक कंपनी ऑनश्योरिटीने देशभर केलेल्या पाहणीत ही गंभीर बाब समोर आली आहे. 

८३% जणांना त्यांच्या कंपनीनेच आरोग्य विमा काढल्याचे ठाऊक नाही!

पाहणीत कुणाचा सहभाग? कंपनीने दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, तसेच चंडीगड आदी शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल १,१५० कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली. 

हे झाले उघड...६०% लोकांना हेच माहीत नव्हते की, कंपनीने त्यांच्यासाठी नेमका कोणत्या कंपनीकडून विमा काढला आहे. १० पैकी ९ जणांकडे कंपनीने काढलेला आरोग्यविमा होता, परंतु यातील २ जणांना त्याची रक्कम ठाऊक नव्हती. १० पैकी केवळ एकानेच आरोग्यविम्यासाठी दावा दाखल केला आहे. ८३ टक्के जणांना आरोग्य विम्यामध्ये वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, याची माहिती नाही. ७१% जणांना आरोग्यविमा पॉलिसीच्या लाभधारकांमध्ये आई-वडिलांनाही समावेश आहे, याची कल्पना नव्हती. 

लाखोंच्या बिलांमुळे खिसा रिकामा ८४% जणांनी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्या वेळीच केल्या असत्या, तर गंभीर आजार होण्याची जोखीम वाढली नसती. 

१६% जणांनी आरोग्य विम्याची नीट माहिती न घेता, उपचारांवर प्रचंड पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांना आता आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. 

५ टक्के कंपन्याच देताच सर्वंकष विमा गेल्या काही दिवसांत देशात आरोग्य विम्याविषयी जागृती वाढली आहे. याबाबत माहिती घेण्यास लोक उत्सुक असतात. आजही देशातील केवळ ५ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष विमा काढतात. यात आरोग्य विमा, अपघात किंवा अपंगत्व विमा, टर्म लाइफ इन्शुरन्स आदींचा समावेश.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत