दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:00 IST2025-11-12T12:59:44+5:302025-11-12T13:00:33+5:30
सध्या तपास यंत्रणा मुजम्मिलची सखोल चौकशी करत असून त्याच्या फोनही खंगाळला जात आहे.

दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर, तपास यंत्रणांकडून कसून तपास सुरू असून सातत्याने नवनवी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आपण आणि आपला सहकारी 'उमर'ने या हल्ल्याचा कट रचला होता, असे मुख्य संशयित मुजम्मिलने चौकशीत दरम्यान कबूल केले आहे. सध्या तपास यंत्रणा मुजम्मिलची सखोल चौकशी करत असून त्याच्या फोनही खंगाळला जात आहे.
‘26 जानेवारी’ला मोठ्या हल्ल्याची तयारी होती -
संबंधित प्रकरणासंदर्भात एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुजम्मिलने पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत मोठ्या घातपात करण्याचा कट आखला होता. या कटात लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याचा डाव होता. एवढेच नाही तर, आपण सुरुवातीला दिवाळीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचे ठरवले होते, मात्र नंतर, तो प्लॅन पुढे ढकलला आणि 26 जानेवारीला हल्ला करण्याचे ठरवले, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले.
फरीदाबादमधील ‘अल फलाह’ विद्यापीठाशी संबंध -
मुजम्मिल फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात वरिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत होता, तर स्फोटात सहभागी असलेला उमरही त्याच विद्यापीठात काम करत होता. पोलिसांच्या मते, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मुजम्मिलच असून स्फोटावेळी उमरचा मृत्यू झाला असावा, अशी शंकाही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
'व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम' -
सुरुवातीच्या तपासानुसार, लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटात अनेक सुक्षित लोक आणि मेडिकल प्रोफेशनल्सचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, जम्मू-काश्मीर पोलिसांनी या गटाला 'व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम' (White Collar Terror Ecosystem) असे नाव दिले आहे.