सुंदर पत्नी पतीसाठी बनली त्रासदायक; लग्नानंतर तीनच दिवसांत उचललं असं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:06 IST2022-02-17T10:04:45+5:302022-02-17T10:06:06+5:30

नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल...?

The beautiful wife became a annoying to the husband and left the husband in chhatarpur of Madhya Pradesh | सुंदर पत्नी पतीसाठी बनली त्रासदायक; लग्नानंतर तीनच दिवसांत उचललं असं मोठं पाऊल

सुंदर पत्नी पतीसाठी बनली त्रासदायक; लग्नानंतर तीनच दिवसांत उचललं असं मोठं पाऊल

भोपाल : प्रत्येक स्त्रीला अथवा पुरुषाला सुंदर पती अथवा पत्नी मिळावी, अशी इच्छा असते. मात्र, दोघांपैकी एक अधिक सुंदर किंवा सुशिक्षित असेल तर नाते टिकून राहते, पण काही लोक नाते तोडून वेगळेही होतात. अशाच एका नात्याची कहाणी मध्य प्रदेशातून समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या सुंदर पत्नीला परत मिळविण्यासाठी प्रचंड आटापिटा करत आहे. 

गेल्या वर्षी झालं होतं लग्न -
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याजवळील बांदा येथील माटोंध गावातील नंदू पाल नावाच्या एका व्यक्तीने लवकुशनगर पोलीस ठाणे परिसरातील रीना पालसोबत गेल्या वर्षी ३० एप्रिलला लग्न केले होते. नंदूची पत्नी रीना दिसण्याबरोबरच शिक्षितही आहे. अशातच एक दिवस ती माहेरी गेली, नंतर परत आलीच नाही.

सासुरवाडीतील लोकांनी केली मारहाण -
नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल. नंदूचे म्हणणे आहे की, लग्नानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. मात्र, ती आता परत यायला तयार नाही. तो तिला घेण्यासाठी गेला असता सासरच्यांनी त्याला खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. आता नंदू पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारत आहे.

लग्नानंतर केवळ तीन दिवसच होती सोबत -
नंदू म्हणतो, लग्ना वेळी आपण स्टेटसनुसार दागिनेही दिले होते. त्याची बायको दिसायला खूप सुंदर आणि शिकलेली आहे. पण तो फार सुंदर नाही. लग्नानंतर ती त्याच्यासोबत फक्त ३ दिवस राहिली. यानंतर ती तिच्या माहेरी गेली आणि आता सासरी येण्यास तयार नाही.

एसपी ऑफिसकडे न्यायाची मागणी - 
नंदू पत्नीला घेण्यासाठी सासूरवाडीला गेला असता, त्याला तेथे मारहाण करण्यात आली. मात्र, रीना नंदूला भेटायलाही आली नाही. यानंतर नंदू पाल लवकुशनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र तेथेही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यथित नंदूने आता छतरपूरच्या एसपी कार्यालयात न्यायासाठी दाद मागितली आहे.

Web Title: The beautiful wife became a annoying to the husband and left the husband in chhatarpur of Madhya Pradesh