सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:34 IST2025-09-27T16:34:12+5:302025-09-27T16:34:34+5:30
Madhya Crime News: कुटुंबामधील नणंद-भावजयीचं नातं हे काहीसं चटपटीत, खुसखुशीत मानलं जातं. त्यांच्यामध्ये कधी गोडीगुलाबी असते तर कधी खटके उडतात. मात्र मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडलेल्या एका घटनेने साऱ्यांनाच अवाक केलं आहे.

सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग
कुटुंबामधील नणंद-भावजयीचं नातं हे काहीसं चटपटीत, खुसखुशीत मानलं जातं. त्यांच्यामध्ये कधी गोडीगुलाबी असते तर कधी खटके उडतात. मात्र मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडलेल्या एका घटनेने साऱ्यांनाच अवाक केलं आहे. येथील एक नणंद तिच्या वहिनीच्या सौंदर्यावर एवढी मोहित झाली की, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही शेवटी ही नणंद आण भावजय मिळून घर सोडून पळून गेले.
जबलपूरमधील अमरपाटन भागातील ही घटना असून, येथील आशुतोष नावाच्या तरुणानं सुमारे ७ वर्षांपूर्वी संध्या नावाच्या तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघांचंही वैवाहिक जीवन आनंदात सुरू होतं. तसेच पाच वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगाही झाला. यादरम्यान, आशुतोष हा मुलाच्या शिक्षणासाठी पत्नीसह जबलपूर येथे राहायला आला.
जबलपूरमध्ये आशुतोष याची मामेबहीण म्हणजेच संध्याची नणंद मानसी हिचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं. तसेच नणंद आणि भावजयीमध्ये गप्पागोष्टी होऊ लागल्या. कधी कधी दोघीही एकत्र बाजारात जायच्या. मात्र नणंद आणि भावजयीच्या नात्यामुळे त्यांच्यााबाबत कुणाला शंका आली नाही.
यादरम्यान, १२ ऑगस्ट रोजी आशुतोष याची पत्नी संध्या घरातून अचानक गायब झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती जबलपूर येथील रेल्वे स्टेशनवर सापडली. त्यानंतर ती पुढचे काही दिवस पती आणि मुलासोबक राहिली. मात्र २२ ऑगस्ट रोजी ती पुन्हा गायब झाली. मात्र २२ ऑगस्ट रोजी ती आपला मोबाईल घर सोडून बाहेर गेली ती परत माघारी आली नाही.
पत्नी अचानक गायब झाल्याने पती आशुतोष चिंतेने व्याकूळ झाला. मात्र ती त्याच्याच बहिणीसोबत पळून गेली असावी अशी त्याला शंकाही आली नाही. पतीने जेव्हा पत्नीचा घरात ठेवलेला फोन चाळला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यामध्ये त्याला त्याची पत्नी संध्या आणि मामेबहीण मानसी यांच्यामधील रोमँटिक चॅटिंग सापडले. ते पाहून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
यानंतर आशुतोष याने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. मात्र संध्या हिने सोबत मोबाईल न घेतल्याने तिचा ठावठिकाणा शोधणं कठीण बनलं आहे. मात्र पोलिसांना काही तांत्रिक पुरावे सापडले आहेत. त्याआधारावर संध्या हिचा शोध सुरू आहे.