खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:02 IST2025-10-01T18:01:30+5:302025-10-01T18:02:10+5:30
Crime News: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन प्रेयसीने तिचा बॉयफ्रेड मोहम्मद सद्दाम याची चाकूने भोसकून हत्या केली. गर्भपात आणि लग्नावरून झाालेल्या भांडणामुळे झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी १६ वर्षीय प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन प्रेयसीने तिचा बॉयफ्रेड मोहम्मद सद्दाम याची चाकूने भोसकून हत्या केली. गर्भपात आणि लग्नावरून झाालेल्या भांडणामुळे झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी १६ वर्षीय प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने तिचा प्रियकर सद्दाम याची तो झोपलेला असताना चाकूने सपासप वार करून हत्या केली. त्यानंतर ही तरुणी विलासपूरला पळून गेली. तसेच तिने तिच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज आणि रक्ताच्या डागावरून माग काढत पोलिसांनी तिला पकडले.
या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही चित्रफित समोर आली आहे. त्यामध्ये एक जोडपं हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. तसेच यातील मुलीने चेहरा लपवण्यासाठी स्कार्फ घातलेला होता. तर युवकाने काळा शर्ट घातला होता. आपल्या प्रियकराची हत्या केल्यानंतर ही तरुणी २७ सप्टेंबर रोजी बिलासपूर येथे पळून गेली होती. तिथे तिने तिच्या आईला सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला विलासपूरमधील कोनी पोलीस ठाण्यात नेले.
तिथे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन याबाबतची माहिती रायपूर पोलिसांना दिली. या माहितीनंतर लॉजमधील खोली उघडली अशता त्यामध्ये मोहम्मद सद्दाम याचा मृतदेह सापडला. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या चित्रफितीनुसार या जोडप्याने लॉजमध्ये दोन वेळ चेक इन केलं होतं. तसेच सद्दाम याची हत्या केल्यानंतरही या तरुणीने लॉज मालकाला फोनवरून खोटी माहिती दिली होती.
आता पोलिसांनी या प्रकरणी सदर अल्पवयीन तरुणीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत मोहम्मद सद्दाम हा मुळचा बिहारमधील रहिवासी होती. तसेच तो २८ सप्टेंबर रोजी शेवटचा दिसला होता. त्यानंतर हे हत्याकांड घडले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणी आणि सद्दाममध्ये जोरदार भांडण झालं होतं. ही तरुणी गर्भवती होती आणि सद्दाम तिला गर्भपात करण्यास सांगत होता. त्यावरून खूप वादावादी झाली. त्यानंतर सद्दाम गाढ झोपला. तेव्हा संधी साधत या तरुणीने सद्दामची हत्या केली.