घर बांधण्यासाठी जमीन विकून १४ लाख जमवले; सहावीतल्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये उडवून दिला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:12 IST2025-09-16T17:10:22+5:302025-09-16T17:12:10+5:30

उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमच्या नादात सहावीतल्या मुलाने वडिलांचे १४ लाख रुपये उडवल्याचे समोर आलं आहे,

The 13 year old boy lost all his money in an online gaming app then end life out of fear | घर बांधण्यासाठी जमीन विकून १४ लाख जमवले; सहावीतल्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये उडवून दिला जीव

घर बांधण्यासाठी जमीन विकून १४ लाख जमवले; सहावीतल्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये उडवून दिला जीव

UP Online Game Death: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन किती धोकादायक ठरू शकते याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून समोर आले आहे. लखनऊमध्ये एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय यश कुमार सहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाइन गेम खेळताना यशने त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातून १३ लाख रुपये गमावले होते. त्याच्या घरच्यांना हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांना कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार आहे. मात्र जबर मानसिक धक्का बसल्याने यशने टोकाचं पाऊल उचललं.

लखनऊमधील १३ वर्षीय यशने फ्री फायर या ऑनलाइन गेममध्ये अडकल्यामुळे आत्महत्या केली. या गेममध्ये त्याने घर बांधण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याचे शेत विकून बँकेत जमा केलेले १४ लाख रुपये त्याने गमावले होते. यामुळे तो घाबरला होता. कुटुंबातील सदस्यांच्या भीतीमुळे त्याने हे भयानक पाऊल उचलले. मोहनलालगंज येथील धनुवासद गावात हा सगळा प्रकार घडला. सुरेश कुमार यादव यांचा मुलगा यश कुमार हा सहावीत शिकत होता. सुरेश हे सोमवारी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. तिथे त्यांना खात्यात काहीच पैसे नसल्याचे कळले. त्यामुळे खात्यातून पैसे गायब झाल्याची तक्रार बँक व्यवस्थापकाकडे केल्यानंतर ते घरी परतले.

सुरेश घरी आले आणि त्यांनी सर्व प्रकार त्यांच्या कुटुंबाला सांगितला. यश त्यावेळी घरीच होता. वडिलांना खात्यातून पैसे गायब झाल्याचे कळताच तो त्याची बॅग घेऊन अभ्यासाच्या बहाण्याने टेरेसवरील खोलीत गेला. पैसे गेल्याच्या भीतीने घरातले ओरडतील म्हणून भीतीने त्याने खोलीत गळफास घेतला. रात्री यशची बहीण वरच्या खोलीत गेली तेव्हा यश तिला फाशीवर लटकलेला दिसला. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सगळे लोक टेरेसवर पोहोचले आणि त्यांनी यशला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

"माझा मुलगा कोचिंगमध्ये होता आणि मी घरी परत आलो तेव्हा मी त्याला गळफास घेतलेले पाहिले. त्याने हे केले तेव्हा घरी कोणीही नव्हते. तो ऑनलाइन गेम खेळत होता. माझ्या खात्यात ११ लाख रुपये होते आणि काही जास्त पैसे देऊन तो खेळला आणि त्याने ते सर्व गमावले. त्याने मला काहीही सांगितले नव्हतं," असं यशच्या वडिलांनी सांगितले.

यशला अभ्यासादरम्यान मोबाईलवर गेम खेळण्यापासून अनेक वेळा रोखण्यात आले होते. क्लासच्या शिक्षकानेही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तो गेमचे व्यसन सोडू शकला नाही. शेवटी या व्यसनाने त्याचा जीव घेतला.
 

Web Title: The 13 year old boy lost all his money in an online gaming app then end life out of fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.