Thanjavur Accident : तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 09:44 IST2022-04-27T09:43:59+5:302022-04-27T09:44:48+5:30

या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे आणि होरपळल्याचे वृत्त आहे.

Thanjavur Accident: Major accident during temple festival in Tamil Nadu; 10 killed, 15 injured due to electric shock | Thanjavur Accident : तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Thanjavur Accident : तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. येथे मंदिर उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळे, संपूर्ण रथात करंट पसरले आणि त्याला आग लागली.

रथ यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भावीक जमले होते. रथ यात्रा सुरू असतानाच रथाचा स्पर्श वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना झाला. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे आणि होरपळल्याचे वृत्त आहे. यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत  मदत आणि बचाव कार्य केले.

यासंदर्भात बोलताना संबंधित भागाचे आयजी व्ही बालकृष्णन म्हणाले, या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. मिरवणुकीदरम्यान रथ विजेच्या तारांच्या संपर्कात आला होता. यामुळे ही दुर्घटना घडली.

Web Title: Thanjavur Accident: Major accident during temple festival in Tamil Nadu; 10 killed, 15 injured due to electric shock