BREAKING: काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या, मारेकऱ्यांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 18:05 IST2021-08-17T18:05:09+5:302021-08-17T18:05:54+5:30
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका भाजपा नेत्याची हत्याची केल्याची माहिती समोर आली आहे.

BREAKING: काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या, मारेकऱ्यांचा शोध सुरू
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका भाजपा नेत्याची हत्याची केल्याची माहिती समोर आली आहे. जावेद अहमद दार असं हत्या झालेल्या भाजपा नेत्याचं नाव असून ते होमशालिबागचे विभाग अध्यक्षपदी काम पाहात होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दार यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. भाजपानं या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
जावेद अहमद दार यांची त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.