शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Terrorist : 'दिल्लीत पुन्हा दहशतवादी पकडला, Ak 420 अन् AK 56 वाले काय करतायंत'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:25 PM

Terrorist : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देआपला शेजारील देश पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा डाव आखतो. सणासुदीच्या काळात विविध ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचतो, अशावेळी दिल्लीचे मालक एके 420 आणि सुप्रीम लीडर एके56 काय करतायंत?, असा प्रश्न काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी विचारला आहे

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूक आणि मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबाचा हा दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यामुळे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून AK-47, काडतूस आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. आपला शेजारील देश पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा डाव आखतो. सणासुदीच्या काळात विविध ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचतो, अशावेळी दिल्लीचे मालक एके 420 आणि सुप्रीम लीडर एके56 काय करतायंत?, असा प्रश्न काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी विचारला आहे. सिंघवी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच, देशाच्या सुरक्षेसाठी आपण काय रणनिती आखता, असा सवालही त्यांनी ट्विट करुन विचारला आहे. 

दहशतवाद्याची चौकशी सुरू

दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की एक पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीterroristदहशतवादीdelhiदिल्लीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल