जम्मू काश्मीरात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 04:16 PM2018-01-08T16:16:01+5:302018-01-08T16:19:25+5:30

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे पोलीस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा जवनांनी एका दहशतवाद्याला ठार केलं

A terrorist attack on the police in Jammu Kashmir, 1 terrorist killed | जम्मू काश्मीरात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला केलं ठार

जम्मू काश्मीरात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला केलं ठार

Next

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे पोलीस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा जवनांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. मिळालेल्या माहितीनुसार, जुहामा येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरु आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी पोलीस पथकाला लक्ष्य करत दहशतवादी हल्ला केला होता. याआधी उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता. 


गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. 

अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली असून त्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत पण त्याचवेळी दहशतवादीसुद्धा सुरक्षापथकांना टार्गेट करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. काश्मीर पोलिसांनी मात्र सत्यता तपासत असल्याचं सांगितलं होतं. शहीद जवानांची ओळख उप-निरीक्षक इरशाद अहमद, कॉन्स्टेबल गुलाम नबी, कॉन्स्टेबल परवेज अहमद आणि मोहम्मद आमीन अशी झाली होती. 
 

Web Title: A terrorist attack on the police in Jammu Kashmir, 1 terrorist killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.