काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:27 IST2017-09-21T15:25:16+5:302017-09-21T15:27:39+5:30
जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात थोडक्यात वाचले आहेत.

काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी
श्रीनगर, दि. 21 - जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात थोडक्यात वाचले आहेत. गुरूवारी दुपारी सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या हल्ल्यात तीन नागरीक ठार झाले असून सीआरपीएफ जवानांसह 24 जण जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दहशतवाद्यांनी गुरूवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बस स्थानकाजवळ गर्दी असलेल्या मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला केला. 11 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला झाला. जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. हल्ला झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पोलीस ठाणे हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते, असे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटली आहे. जी.एच. नबी पराग, इक्बाल खान आणि पिंटी कौर अशी त्यांची नावे आहेत.