शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 10:44 IST

श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीनगर - श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू असल्याची माहिती आहे. या  दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.बीएसएफच्या 182 बटालियनवर दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे. एका इमारतीत आणखी तीन ते चार दहशतावादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला आहे. तीन ते चार दहशतवादी बीएसएफ कॅम्पमधील एका इमारतीत लपले आहेत.  श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्याच्या हेतूनं दहशतवादी आले होते, मात्र भारतीय लष्कराला त्यांची माहिती मिळताच त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांना विमानतळात घुसता आले नाही.  हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिरTerrorismदहशतवाद