CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:51 PM2021-05-14T17:51:01+5:302021-05-14T17:52:34+5:30

CoronaVirus: कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असून, परवानगी द्यावी, अशी याचिका एका दहशतवाद्याने केली आहे.

terrorist of al qaeda in tihar jail propose to work as doctor for corona patients | CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका

CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका

googlenewsNext
ठळक मुद्देतिहारमधील दहशतवाद्याची याचिकाफेब्रुवारीत विशेष पथकाकडून अटककोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी देण्याची विनंती

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. यातच आता कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असून, परवानगी द्यावी, अशी याचिका एका दहशतवाद्याने केली आहे. (terrorist of al qaeda in tihar jail propose to work as doctor for corona patients)

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कारागृहातील कैद्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होताना दिसत आहे. पाकिस्तानातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला एक दहशतवादी याच तिहार कारागृहात आहे. हा दहशतवादी पेशाने डॉक्टर असून, त्याने कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली असून, तशी याचिका दिल्लीतील विशेष सत्र न्यायालयात करण्यात आली आहे. सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करणाऱ्या या डॉक्टरचे नाव सबील अहमद आहे. शनिवार, १५ मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष

फेब्रुवारीत विशेष पथकाकडून अटक

सबील अहमदवर सन २००७ मध्ये ब्रिटनमधील ग्लासगो विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. भारत आणि परदेशातील अल-कायदाच्या सदस्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून २२ फेब्रुवारी रोजी अहमदला विशेष पोलीस पथकाने अटक केली. हा दहशतवादी आताच्या घडीला तिहार मध्यवर्ती कारागृहात असून, आरोप निश्चिती आणि त्याच्यावरील खटला सत्र न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. 

“घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

दिल्लीतील सत्र न्यायालयात अर्ज

कैद्यांमधील वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे तुरुंग प्रशासनाला मदत करण्याची इच्छा असल्याचे अहमदने याचिकेत म्हटले आहे. वकील एम. एस. खान यांच्यामार्फत दिल्लीतील सत्र न्यायालयात अहमदने अर्ज केला आहे. अहमद एमबीबीएस डॉक्टर असून त्यांच्याकडे सात वर्षांचा अनुभव असल्याचा दावाही वकिलांनी याचिकेत केला आहे. तसेच आपल्या अशीलाला रुग्णांना हाताळण्याचा व त्यांच्यावर उपचार करण्याचा अनुभव असून, त्याच्या या कौशल्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांसाठी होऊ शकतो, म्हणूनच कैद्यांवर उपचार करण्याची परवानगी अहमदला देण्यासंदर्भात तुरुंग अधीक्षकांना निर्देश द्यावेत, अशी विनंती विशेष सत्र न्यायालयाला करण्यात आली आहे.  

धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. तर, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.
 

Web Title: terrorist of al qaeda in tihar jail propose to work as doctor for corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.