श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 20:53 IST2024-02-07T20:53:34+5:302024-02-07T20:53:50+5:30
गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये देशातून आलेल्या पर्यटक, मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत.

श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गैर काश्मीरी लोकांवर हल्ला केला आहे. या गोळीबारात एका शीख व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती अमृतसरचा राहणारा आहे. तर अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये देशातून आलेल्या पर्यटक, मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. आजच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली आहे.
अमृतपाल सिंग असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर गंभीर जखमीचे नाव रोहित माशी असे आहे. पोटाला गोळ्या लागल्याने माशी जखमी झाला आहे.