उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भीषण अपघात, गाडी दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:32 IST2022-11-18T19:31:28+5:302022-11-18T19:32:08+5:30

अपघातावेळी गाडीमध्ये 16 जण होते.

Terrible accident in Uttarakhand's Chamoli, 11 people died after the car fell into the valley | उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भीषण अपघात, गाडी दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भीषण अपघात, गाडी दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू


Chamoli Accident:उत्तराखंडमधील चमोली येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमध्ये बोलेरो मॅक्स अचानक 700 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, एसडीआरएफलाही माहिती देण्यात आली. सध्या टीम मदत कार्यात गुंतलेली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार बोलेरो मॅक्स गाडीत 16 जण होते.

अपघाताबाबत एसडीआरएफकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. एसडीआरएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, चमोलीच्या पल्ला जाखोल गावात दुमका रोडवरील 500-700 खोल दरीत वाहन पडले. यामध्ये 16 लोक होते. बचाव कार्य सुरू असून, पांडुकेश्वर येथून आणखी एक SDRF टीम पाठवण्यात आली आहे.

Web Title: Terrible accident in Uttarakhand's Chamoli, 11 people died after the car fell into the valley