उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:52 IST2023-11-17T12:51:54+5:302023-11-17T12:52:24+5:30

उत्तराखंड येथील नैनीलाल जवळ भीषण अपघात झाला, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Terrible accident in Uttarakhand! Jeep fell into 500 meters deep gorge, 8 people died | उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील नैनीलाल येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. रोजवरुन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच मदत मोहिम सुरू केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. या जीपमध्ये एकुण ११ जण प्रवास करत होते, यातील ८ जणांचा जागीच मृ्तयू झाला असून अन्य तिघांना रुग्णालयात दाखल केले आहे. हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. 

इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध केला, चर्चेसाठी आवाहन केले

अपघाताची माहिती पोलिस प्रशासनालाही देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जीपमधील जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांना क्रिटिकल केअरमध्ये ठेवण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी, नैनितालच्या ओखलकांडा येथे हा अपघात झाला. येथे दाल कन्या येथील रहिवासी राजू पनेरू यांची जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यावेळी त्यांच्या जीपमध्ये ११ जण बसले होते. पोलिसांनी ८ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

Web Title: Terrible accident in Uttarakhand! Jeep fell into 500 meters deep gorge, 8 people died