भीषण अपघात! भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 12:26 IST2021-11-02T12:25:57+5:302021-11-02T12:26:27+5:30
घटनेनंतर संतत्प ग्रामस्थांनी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून ठिय्या केलं.

भीषण अपघात! भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू
गाझीपूर:उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात बुधवारी भीषण अपघात झाला. त्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला.
नेमकं काय घडलं ?
सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील अहिरोली गावात भीषण अपघात घडला. पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7 वाजता अहिरोली चाटीजवळ एक अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत धुसला. यादरम्यान ट्रकने झोपडीत झोपलेल्या 10 जणांना चिरडंल, यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले.
नुकसान भरपाईची मागणी
अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक अनियंत्रित होण्याचे कारण अद्याप सांगितलेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून ठिय्या केला. काही वेळानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून शांत केलं.