भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 11:34 AM2023-12-16T11:34:12+5:302023-12-16T12:21:51+5:30

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले

Terrible accident! Accident with a rickshaw coming from Deodarshana, 5 people died in sabarimala mallampur | भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू

भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू

केरळच्या मल्लापूरम येथे एका भीषण दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रवाशांनी भरलेली ऑटो रिक्षा आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. सबरीमाला येथून दर्शन करुन येत असताना मल्लापूरम येथे भाविकांच्या ऑटो रिक्षाला धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पोलिसांशी संपर्क साधला. 

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मल्लापूरम पोलिसांकडून घटनेचा तपास करण्यात येत असून आरटीओ कार्यालयाचीही मदत घेतली जात आहे. येथील रस्ता खराब असल्यानेच हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सबीरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद आसन आणि रेहान यांचा समावेश आहे. तर, दुर्घटनेतील जखमींना कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. ही बस सबरीमाला येथून भाविकांनी घेऊन येत होती. त्यामुळे, सबरीमाला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसच्या कंडीशनचीही तपासणी केली जाणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 

Web Title: Terrible accident! Accident with a rickshaw coming from Deodarshana, 5 people died in sabarimala mallampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.