श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील लोलाबच्या पुत्शाई भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलाने गुरुवारी या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यावर चकमक सुरू झाली. चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले असून, कारवाई सुरू आहे. (वृत्तसंस्था)(वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}