शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 6:07 AM

केसीआर यांचा प्लॅन यशस्वी ठरण्याची चिन्हे

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात मुदतीआधीच सरकार बरखास्त करून एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. तीन महिने आधीच प्रचाराची संधी मिळाल्याने केसीआर यांच्या टीआरएसच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यामुळेच विरोधकांनी आश्चर्यकारकरित्या एकजूट बांधून केलेल्या आघाडीचा म्हणावा तसा परिणाम झाल्याचे सध्याच्या एक्झिट पोलवरून तरी दिसत नाही. मुदतपूर्व सरकार बरखास्त करण्याचा निर्णय केसीआर यांच्या पथ्थ्यावरच पडेल, अशीस्थिती आहे.तेलंगणात ११९ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी १०५ उमेदवारांची घोषणा केसीआर यांनी ६ सप्टेंबर रोजी सरकार बरखास्त केल्यानंतर काही मिनिटांतच केली होती. त्यामागे पुरेसा वेळ मिळावा, हीच रणनिती असावी, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. काँग्रेस, टीडीपी, टीजेएस आणि सीपीआय आघाडीने देखील मिळालेल्या कालावधीत चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, टीडीपीबद्दल जे आकर्षण आणि लोकप्रियता आंध्र प्रदेश राज्य एकत्रित असताना होती. ती आता दिसली नाही. त्याउलट काही मतदारसंघात केवळ एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रेम करणारे मतदारच अधिक दिसले. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारसभांमध्ये चंद्राबाबू ज्या ज्या मतदारसंघात गेले. त्या ठिकाणी काही प्रमाणात हलचल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने देखील २०१४ मध्ये २१ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचीही ताकद दुर्लक्षित करता येत नाही.२०१४ मध्ये केसीआर यांच्या टीआरएसला ३४.३ टक्के मतदान झाले होते. तर काँग्रेस २१, टीडीपी १५, एमआयएम ३.८, तर भाजपला ७.१ टक्के मतदान झाले होते. आता मात्र पक्षनिहाय मिळालेली मतांची टक्केवारी अनेकांची गणिते घडविणारी किंवा बिघडवणारी ठरणार आहे. प्रत्यक्षात मतदारांनी कोणाला किती मतांचे दान दिले आहे, हे ११ डिसेंबरलाच समजणार आहे. के. चंद्रशेखर राव गजवेल मतदारसंघातून रिंगणात होते. आताही याच मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांना ८६, ६९४ मते मिळाली होती. त्यांनी टीडीपीच्या प्रताप रेड्डी यांचा १९,३९१ मतांनी पराभव केला होता. या वेळी मात्र काँग्रेस आघाडीत टीडीपी सहभागी आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेल्या रेड्डी यांनीही त्यांना चांगली टक्कर दिली असण्याची शक्यता आहे. ते येत्या मंगळवारी स्पष्ट होईलच.रंगतदार लढतीकाही मतदारसंघात निवडणूक अतिशय रंगतदार झाली आहे. मात्र, गेल्या वेळी २०१४ मधील काही निवडक मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्या मतांची टक्केवारी बघितल्यास या वेळी कोणत्या पक्षाला तिथे संधीमिळू शकते, हे स्पष्ट होते.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के.टी. रामाराव, भाचे टी. हरीश राव तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, भाजपचे टी. राजा सिंह यांच्या मतदारसंघातील निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेस