शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 23:25 IST

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा रविवार (1 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.45 पर्यंत बंद राहील.  पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

...म्हणून पुन्हा सुरू झाला तणाव - मणिपूरमध्ये जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंफाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे फिजाम हेमजीत (20) आणि हिजाम लिनथोइनगांबी (17) असे आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह - राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, बेपत्ता विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात, मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.

बिरेन सिंह म्हणाले, "महत्त्वाच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह बुधवारी सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधता येईल. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेटSchoolशाळाPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग