श्रीनगरचे तापमान गोठणबिंदूखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 04:54 IST2018-11-08T04:53:03+5:302018-11-08T04:54:03+5:30
यंदाच्या हिवाळ्यात श्रीनगरमध्ये बुधवारची रात्र अत्यंत गारठलेली ठरली. येथे पहिल्यांदाच पारा गोठणबिंदूखाली घसरला.

श्रीनगरचे तापमान गोठणबिंदूखाली
श्रीनगर - यंदाच्या हिवाळ्यात श्रीनगरमध्ये बुधवारची रात्र अत्यंत गारठलेली ठरली. येथे पहिल्यांदाच पारा गोठणबिंदूखाली घसरला. चालू आठवडाअखेर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. बुधवारी शहरातील किमान तापमान उणे २.२ सेल्सियश अंश नोंदले गेले. रात्री मात्र
पहिल्यांदा पारा सर्वसामान्य तापमानापेक्षा ५ सेल्शिअस अंशावर घसरला होता. काश्मीर खोरे आणि लडाख क्षेत्रातही तापमानाचा पारा गोठणबिंदूखाली होता. गुलमर्ग येथील तापमानही उणे ६.६ अंशावर होते. (वृत्तसंस्था)