मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 23:54 IST2025-02-22T23:54:15+5:302025-02-22T23:54:50+5:30

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील SLBC बोगद्यात अपघात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway | मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु

मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलापेंटा येथे एसएलबीसी बोगद्यात झालेल्या अपघातात एका वरिष्ठ अभियंत्यासह आठ कामगार अडकले आहेत. पंतप्रधानांनी तात्काळ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत बचावकार्य सुरळीत पार पाडले पाहिजे. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अचानक पाणी आणि चिखलाचा लोट वाहत असल्याने बोगद्या काही भाग खचला. त्यामुळे सुमारे ८ किलोमीटरचा खड्डा पडला. बोगद्याच्या बोअरिंगच्या कामात सहभागी असलेल्या जेपी असोसिएट्स आणि रॉबिन कंपनीने सांगितले की, सकाळी ८ वाजता काम सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांनी ही घटना घडली.

बोगदा खचल्यानंतर काही कामगार सुरक्षितपणे पडले होते बाहेर

बोगदा खचण्यापूर्वी मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर पाणी आणि चिखल वेगाने बोगद्यात शिरला, ज्यामुळे कामगारांना सुरक्षिततेसाठी पळावे लागले, असे म्हटले जाते. टीबीएमजवळ असलेले कामगार सुरक्षितपणे बाहेर पडू शकले, परंतु बोगद्याच्या पुढील भागात काम करणारे कामगार अडकले. खोदकाम लगेचच थांबवण्यात आले आणि शक्य तितक्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तरीही आठ कामगार आत अडकले.

बचावकार्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू

अडकलेल्या कामगारांसाठी सुसज्ज व्यवस्था अजूनही कार्यरत आहे. तेथे ऑक्सिजनचा पुरवठा कायम ठेवण्यात आला आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पूर्ण तयारीने घटनास्थळी तैनात आहेत. आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरही सज्ज आहेत.

घटनास्थळी तज्ज्ञांचे पथक आणि सैन्य तैनात

राज्यमंत्री कॅप्टन एन उत्तम कुमार रेड्डी यांनी आश्वासन दिले आहे की राज्य सरकार सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करत आहे. त्यांनी सांगितले की, या संकटाचा सामना करण्यासाठी NDRF आणि भारतीय लष्करातील तज्ज्ञ पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.