शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:17 IST

Telangana Lok Sabha Election 2024; हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत  आल्या आहेत. हैदराबादमध्येभाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं होतं. या विधानावरून आता मोठ्या वादाला तोंड फुटलं असून, एमआयएमने राणांच्या विधानावरून थेट भाजपााला लक्ष्य  केलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. अशा विधानांमुळे निवडणुकीदरम्यान, दोन समुदायांमधील तणाव वाढू शकतो, असा दावा वारिस पठाण यांनी केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्या हैदराबाद या पारंपरिक मतदारसंघामध्ये भाजपाच्या माधवी लता यांनी आव्हान दिले आहे. या माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेथील प्रचारसभेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा म्हणतात की, एक धाकटा  आणि एक मोठा भाऊ आहे. त्यात धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ, या छोट्याला माझं एवढंच सांगणं आहे की, तुला १५ मिनिटं लागतील, पण आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे आहेत.  १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, ओवेसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गेले हे कळणारही नाही, असे सांगताना दिसत आहेत.

आता नवनीत राणा यांच्या या विधानावर वारिस पठाण यांनी पटलवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपा नेते निवडणुकीदरम्यान अशी विधानं करत आहेत जी निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करणारी आहेत. अशी विधानं दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने नवनीत राणा यांच्यावर या विधानासाठी कठोर कारवाई केली पाहिजे.  जर वारिस पठाण याने नवनीत राणांसारखं विधान केलं असतं, तर त्याला आज तुरुंगात टाकलं असतं, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या विधानाबाबत वारिस पठाण म्हणाले की, तेव्हा अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केलं होतं. तसेच जवळपास ४०-४२ दिवस तुरुंगात राहिले होते. नंतर त्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि दोषमुक्त झाले. आता निवडणूक आयोग नवनीत राणा यांच्यावर कधी कारवाई करणार आणि त्यांना तुरुंगात कधी पाठवणार, असा सवाल वारिस पठाण यांनी केला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनhyderabad-pcहैदराबादtelangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४